Ambabai Gondhalala Ye [From "Maharashtra Shaheer"]
अगं धाव आई ठाई ठाई दैत्य मातला
अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला
आता त्रिशूल तू हातात आई घे
बळ तेच आज संबळाला दे
अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अगं काळुबाई गोंधळाला ये
उदो उदो उदो उदो...
हे सप्तश्रुंग वासिनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ
हे आई तुळजाभवानीचा गोंधळ आईचा गोंधळ
अगं माहूरगडवासीनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ
माझ्या करवीरवासीनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ
हे वाघावर बैसूनी अंबा आली ग गोंधळाला
हे साद ऐकून माझी अंबा आली ग गोंधळाला
भक्तीचा आवाज
चढविला गं साज
आज संबळ वाजं
माझ्या आईचा गोंधळाला
आता सरुदे अवस करितो नवस गोंधळाला ये
तुझा करितो गजर राहू दे नजर गोंधळाला ये
चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये
आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये
प्रलयातुनी जगाऽऽऽ
प्रलयातुनी जगा आई तूच तारिले
बळ तेच आज संबळाला दे
अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अगं काळुबाई गोंधळाला ये
अंतरा 2
हे रात सरली काळी गं
उजळलं आभाळी गं
उभी पाठीशी जगदंबा
माय लेकुरवाळी ग
आई संकटातून तार
तुझे उघडुनी ये दार
आई गोंधळाला येना
तुझा मांडला दरबार
तुझ्या दिवटी चा गं जाळ
झाला दुर्जनांचा काळ
आता तुच गं सांभाळ
आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये
अंगार जो तुझ्या ऽऽऽ
नजंरत प्येटला
अन तिच आग संबळाला दे
अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अगं काळुबाई गोंधळाला ये
दुःख निवारक तू जननी
आई तू जननी
शरण तुला मी तव चरणी
धाडी दिशांतरी संकट हे
आई संकट हे
सोडवी क्लेशातूनी दुर्गे
त्रिभुवन जाणूनी तव महिमा
आई तव महिमा
आदिशक्ती तू तूच क्षमा
विजयाचा वर दे अंबे
वर दे अंबे
माय भवानी जगदंबे