Mazi Pandhari Chi Maay

पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाचि साकार विठ्ठल
हरिनामे झंकार विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तू बाप तूच बंधू
तू सखा रे तूच त्राता रे
भूतली या पाठीराखा तूच आता
अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे
संकटी या धावूनी ये तूच आता
होऊन सावली हाकेस धावली
तुजवीण माऊली जगू कैसे
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजवीण माऊली जगू कैसे
करकटावरी ठेवोनी ठाकले विटेवर पाय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
साजिरे स्वरूप सुंदर तहानभूक हरपून जाय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
ना उरली भवभयचिंता रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
तू कळस तूच रे पाया मज इतुके उमजून जाता
राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरवीन आता
लोचनात त्रिभुवन अवघे लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय

संपू दे गा मोह मनीची वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो
भाबडा भाव अर्पिला उधळली चिंता सारी हो
शरण गे माय आता लागले चित्त तुझिया दारी हो
विझल्या मनातील दीपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे
मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाचि साकार विठ्ठल
भक्तीचा उद्धार विठ्ठल
अंतरी मिळे पंढरी सावळा हरी भेटला तेथ
बोलला कुठे शोधीशी मला दशदिशी तुझ्या मी आत
जाहलो धन्य ना कुणी अन्य सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले प्राण लागले ध्यान उघडली ताटी
ना उरली भवभयचिंता रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
मी पणा च सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे

Canzoni più popolari di अजय गोगवले

Altri artisti di Film score