Aarti Saibabachi
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा
चरणरजातली द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा आरती साईबाबा
जाळुनियां अनंग स्वस्वरूपी राहेदंग
मुमुक्षूजनां दावी निज डोळा श्रीरंग
डोळा श्रीरंग आरती साईबाबा
जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव
दाविसी दयाघना ऐसी तुझीही माव
तुझीही माव आरती साईबाबा
तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा
अगाध तव करणी मार्ग दाखवी अनाथा
दाखवी अनाथा आरती साईबाबा
कलियुगी अवतार सगुण परब्रह्मः साचार
अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर
दत्त दिगंबर आरती साईबाबा
आठ दिवसा गुरुवारी भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया भव भय निवारी
भय निवारी आरती साईबाबा
माझा निजद्रव्यठेवा तव चरणरज सेवा
मागणे हेचि आता तुम्हा देवाधिदेवा
देवाधिदेवा आरती साईबाबा
इच्छित दिन चातक निर्मल तोय निजसुख
पजावे माधवा या सांभाळ आपुली भाक
आपुली भाक आरती साईबाबा
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा
चरणरजातली द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा आरती साईबाबा