Sarli Bai Barsaat
सरली बाई बरसात
पिकातून बहरून आली रात
पिकातून बहरून आली रात
झुलत झुलत झाडात
हालते हालते नभ आले दारात
सरली बाई बरसात
झिळमिळ झाल्या पाऊल वाटा
झिळमिळ झाल्या पाऊल वाटा
लाटा हिंकळत्या पाण्यावर पाण्यावर
लाटा हिंकळत्या पाण्यावर पाण्यावर
कुठे हरवले कुठे हरवले डोळे न कळे
हिंदोळ्याच्या आभाळावर मेंदीने भरले हात
सरली बाई बरसात
चिमण्या भिरभिर उडून गेल्या अंगणातले दाणे वेचून
त्यांच्या पाय खुणांची नक्षी अंगणातल्या रांगोळीतून
चिमण्या भिरभिर उडून गेल्या अंगणातले दाणे वेचून
त्यांच्या पाय खुणांची नक्षी अंगणातल्या रांगोळीतून
पंख नवे घरट्यात
सरली बाई बरसात
पक्ष्यांच्या पंखावर आले रानामधले रंग उन्हावर
गाण्याच्या मस्तीत सये गं शब्दांचे झुलणारे अंबर
पक्ष्यांच्या पंखावर आले रानामधले रंग उन्हावर
गाण्याच्या मस्तीत सये गं शब्दांचे झुलणारे अंबर
झिंग नवी प्राणात
सरली बाई बरसात
पिकातून बहरून आली रात
पिकातून बहरून आली रात
झुलत झुलत झाडात
हालते हालते नभ आले दारात
सरली बाई बरसात