Dashratha Ghe He
दशरथा, दशरथा घे हें पायसदान पायसदान
दशरथा घे हें पायसदान पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों
हा माझा सन्मान दशरथा,दशरथा,दशरथा
घे हें पायसदान पायसदान
तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर
श्रीविष्णू भगवान्
दशरथा,दशरथा,दशरथा
घे हें पायसदान पायसदान
श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन
या दानासी या दानाहुन
अन्य नसे उपमान
दशरथा,दशरथा,दशरथा
घे हें पायसदान पायसदान
करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आंतली
करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आंतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही
कामधेनुच्या दुग्धाहुनही
ओज हिचे बलवान
दशरथा,दशरथा,दशरथा
घे हें पायसदान पायसदान
राण्या करतिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
राण्या करतिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल
योद्धे चार महान
दशरथा,दशरथा,दशरथा
घे हें पायसदान पायसदान
प्रसवतील त्या तीन्ही देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
प्रसवतील त्या तीन्ही देवी
प्रसवतील त्या तीन्ही देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान
दशरथा,दशरथा,दशरथा
घे हें पायसदान पायसदान
कृतार्थ दिसती तुझीं लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
कृतार्थ दिसती तुझीं लोचनें आ आ आ
कृतार्थ दिसती तुझीं लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा
दे आज्ञा मज नृपा
पावतो यज्ञीं अंतर्धान
दशरथा,दशरथा,दशरथा
घे हें पायसदान पायसदान दशरथा