Utha Utha Ho Sakalik
उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिचा नायक
सुखदायक भक्तांसी
उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख
अंगी शेंदुराची उटी
माथा शोभतसे कीरिटी
केशर कस्तूरी लल्लाटीं
हार कंठी साजिरा
उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख
कानी कुंडलांची प्रभा
सूर्य चंद्र जैसे नभा
कानी कुंडलांची प्रभा
सूर्य चंद्र जैसे नभा
माजी नागबंदी शोभा
स्मरता उभा जवळी तो
उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख
कासे पीतांबराची धटी
हाती मोदकांची वाटी
रामानंद स्मरता कंठी
तो संकटी पावतो
उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख
वाचे स्मरावा गजमुख