Tujhe Dole Panyane Bharale

P SAVALARAM, VASANT PRABHU

तुझे डोळे
तुझे डोळे पाण्याने भरले
माझे डोळे पाण्याने भरले
डोळे पाण्याने भरले

काळजातल्या रेशीमगाठी
तोडित असता दोघे मिळुनी
गळ्यास मारुन आपुल्या मिठी
प्रीत विचारी कळवळूनी
कसे कुणाचे सांगा चुकले? सांगा चुकले?
डोळे पाण्याने भरले

अबोल आम्ही दोघे बघुनी
प्रीत म्हणाली, जात्ये सोडुनी
कढ दुःखाचे उरी दाबुनी
हात जोडिता थरथरुनी
तिला वंदण्या कर हे जुळले, कर हे जुळले
डोळे पाण्याने भरले

मने भंगली एक होऊनी
धावु लागली तिच्या मागुनी
नकोस जाऊ म्हणता थबकुनी
गहिवरुनी ती म्हणे चुंबुनी
झाले गेले विसरा सगळे, विसरा सगळे
डोळे पाण्याने भरले

Curiosità sulla canzone Tujhe Dole Panyane Bharale di Lata Mangeshkar

Chi ha composto la canzone “Tujhe Dole Panyane Bharale” di di Lata Mangeshkar?
La canzone “Tujhe Dole Panyane Bharale” di di Lata Mangeshkar è stata composta da P SAVALARAM, VASANT PRABHU.

Canzoni più popolari di Lata Mangeshkar

Altri artisti di Film score