Kuni Govind Ghya

C. RAMACHANDRA, P. SAVLARAM

कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
या ग सयांनो या ग या
या ग सयांनो या ग या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
या ग सयांनो या ग या
या ग सयांनो या ग या

नभात फुलवी गोड चांदण्या बाळच ग हसतो
बाळच ग हसतो
महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो
बाळच ग हसतो
दुष्टांना का हुंकारुन ग दहशत हा भरतो
राजफुलाचा विकास घ्या
राजफुलाचा विकास घ्या
चैतन्याचा सुहास घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
या ग सयांनो या ग या
या ग सयांनो या ग या

चार दिशांचे चौखुर सुंदर पृथ्वीच्या पाळणी
पृथ्वीच्या पाळणी
नक्षत्रांचे छत्रकमल हे झुलत्या सिंहासनी
पृथ्वीच्या पाळणी
हसवा रिझवा शिवरायाला जो जो ग गाउनी
युगायुगाचा सारंग घ्या
युगायुगाचा सारंग घ्या
क्रांतीचा हा आरंभ घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
कुणि गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्या
या ग सयांनो या ग या
या ग सयांनो या ग या

Curiosità sulla canzone Kuni Govind Ghya di Lata Mangeshkar

Chi ha composto la canzone “Kuni Govind Ghya” di di Lata Mangeshkar?
La canzone “Kuni Govind Ghya” di di Lata Mangeshkar è stata composta da C. RAMACHANDRA, P. SAVLARAM.

Canzoni più popolari di Lata Mangeshkar

Altri artisti di Film score