Kashi Kaal Nagini
कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी
प्राणविसावा पैलतिरावरि
प्राणविसावा पैलतिरावरि
अफाट वाहे मधि
कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी
सुखी मीन हे
तरति न गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी मीन हे
तरति न गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली
सुखी पाखरे गात चालली
पार वादळी सुधी
कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी
पैलतटी न कां तॄण मी झाले
तुडविता तरी पदी
पैलतटी न का कदंब फुलले
पैलतटी न का कदंब फुलले
करिता माळा कधी
कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी
पापिण खिळले तीरा
पापिण खिळले तीरा विरह हा
शस्त्रावीणॆ वधी
प्राणांचे घे मोल नाविका
प्राणांचे घे मोल नाविका
लावि पार ने अधी
कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी