He Madhava Mohana
हे माधवा मोहना
हे माधवा विठ्ठला हे माधवा आ आ
धरिलास का विठ्ठला
ऐसा तू दुरावा हे माधवा
कासया मी करू व्यर्थ पूजा उपचारा
आज हृदयाचा पडे रिकामा देव्हारा
प्राण उडोनिया जाता
प्राण उडोनिया जाता देह का उरावा
देह का उरावा धरिलास का विठ्ठला
ऐसा तू दुरावा हे माधवा
दाही दिशांतून डोळा दाटला अंधार
पोर पोरकी मी झाले पुरी निराधार
कुठवर देवा आता
कुठवर देवा आता धीर मी धरावा
धीर मी धरावा धरिलास का विठ्ठला
ऐसा तू दुरावा हे माधवा