Diva Pahuni Laxmi Yete
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा मुलांनो शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम् शुभंकरोति कल्याणम्
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा
दिसती पाउलखुणा
शुभंकरोति म्हणा मुलांनो शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम् शुभंकरोति कल्याणम्
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
सौख्य मिळे जीवना
शुभंकरोति म्हणा मुलांनो शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम् शुभंकरोति कल्याणम्
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
रिवाज आहे जुना
शुभंकरोति म्हणा मुलांनो शुभंकरोति म्हणा