Kadhi Kadhi

Ashwini Shende, Nilesh Moharir, Pankaj Pushkar

राब्बा मेरे मे कि करा हाये
इस दिल कि लगी इश्कदा रोग
बडा बेदर्दी हाय जिंदगी ना रही सगी

कधी कधी नजर का भिजते
कधी कधी आस का निजते
कधी कधी मळभ मी होतो
कधी कधी
कधी कधी वादळी वारे
कधी कधी कोरडे किनारे
कधी कधी ऊर का भरतो
कधी कधी
का हरलो असे ना उरले ठसे
केविलवाने कळेल तुला कधी

कधी कधी नजर का भिजते
कधी कधी आस का निजते
कधी कधी मळभ मी होतो
कधी कधी
कधी कधी वादळी वारे
कधी कधी कोरडे किनारे
कधी कधी ऊर का भरतो
कधी कधी

ओ सारे तसे जागच्या जागी
तरी देह उभा बैरागी
असशील तुही मग जागी आहेस ना
घर उभे एकटे आहे
वारा हि मुक्याने वाहे
जीव उगा उपाशी राहे राहील ना
का विझलो असे ना कळले कसे
मनी रात आता सरेल पुन्हा कधी
कधी कधी सूर का चुकतो
कधी कधी नेम का हुकतो
कधी कधी हात का सुटती
कधी कधी
कधी कधी नजर का भिजते
कधी कधी आस का निजते
कधी कधी मळभ मी होतो
कधी कधी

ना ना री ना म नि पा म ग म रे नि
ना ना री ना म नि पा म ग म रे नि
ना ना री ना म नि पा म ग म रे नि
हम्म जरी हवे हवेसे होते
ते तुझे नी माझे नाते
हे प्रेम कुठे मग जाते गेलेच ना
त्या मधाळ राती सरल्या
तुटताना नाही कळल्या
चंदेरी काचा उरल्या सांग का
का रुसलो असे मन वेडे पिसे
कुणी नाही आता येशील पुन्हा कधी
कधी कधी आठवणी वेड्या
कधी कधी बंध हो बेड्या
कधी कधी जीव घुसमटतो
कधी कधी
कधी कधी नजर का भिजते
कधी कधी आस का निजते
कधी कधी मळभ मी होतो
कधी कधी ओ ओ

Curiosità sulla canzone Kadhi Kadhi di Javed Ali

Chi ha composto la canzone “Kadhi Kadhi” di di Javed Ali?
La canzone “Kadhi Kadhi” di di Javed Ali è stata composta da Ashwini Shende, Nilesh Moharir, Pankaj Pushkar.

Canzoni più popolari di Javed Ali

Altri artisti di Pop rock