Thandgaar Hi Hava
हा हा हा थंडगार ही हवा त्यात धुंद गारवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा
जवळ तू मला हवा
थंडगार ही हवा
निळ्या नभात चालली दूरदूर पाखरे
दूर ना जरी तुझ्या जीव अंतरी झुरे
अंतरात बोलतो अबोल प्रीत पारवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा
जवळ तू मला हवा
थंडगार ही हवा
संथ या जलाशयी गात गान कमलिनी
हळूच लाजता मनी फुलत राग-रागिणी
गंध त्यात चंदनी स्वरांत येई गोडवा
अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा
जवळ तू मला हवा
थंडगार ही हवा
फूल प्रीतिचे कुणा अनामिकास वाहते
मुग्धता परि मना नवेच काही सांगते
अशा सुरम्य संभ्रमी भास आगळा नवा
थंडगार ही हवा