Swar Umtave Shubham Karoti
शुभं करोति कल्याणं शुभं करोति कल्याणं
आरोग्यं धनसंपदा आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धि विनाशाय शत्रुबुद्धि विनाशाय
दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते
माझ्या हाथी मी उजळाव्या
घरात माझ्या मंगलज्योती
सुखद असावी अशीच संध्या
स्वर उमटावे शुभंकरोती
स्वर उमटावे शुभंकरोती
रात्री थकुनी निजण्यापूर्वी निजण्यापूर्वी
ओठी यावा अभंग ओवी
भूपाळीते आळवीत मी आळवीत मी
जागे व्हावे पुन्हा प्रभाती
जागे व्हावे पुन्हा प्रभाती
दिवस सरावा करिता सेवा
कंटाळा मज मुळी न यावा
नव्या घरी मी उजळ करावी
उजळ करावी
मराठमोळी जुनी संस्कृती
मराठमोळी जुनी संस्कृती
मी रांधावे
मी वाढावे
तुटू न देता हळू जोडावे
तुटू न देता हळू जोडावे
कुणावरून तरी ओवाळावे
ओवाळावे
जीवन व्हावे एक आरती
जीवन व्हावे एक आरती
स्वर उमटावे शुभंकरोती
शुभं करोति कल्याणं
आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धि विनाशाय
दीपज्योती नमो स्तुते