Phula Phula Re Phula
फुला फुला रे फुला फुला
फुला फुला रे फुला फुला
मी लपले तू शोध मला
गंध कुठे तो शोध फुला
शोध फुला
फुला फुला रे फुला फुला
दिसत नसे पण सुटला दरवळ
दलात भरल्या लहरी अवखळ
दिसत नसे पण सुटला दरवळ
दलात भरल्या लहरी अवखळ
डुले डहाळी जसा झुला
होय जसा झुला
फुला फुला रे फुला फुला
फुला फुला रे फुला फुला
तुझ्या मानसी चाले रुणझुण
तीच सुगंधी माझी गुणगुण
तुझ्या मानसी चाले रुणझुण
तीच सुगंधी माझी गुणगुण
तुझीच प्रीती भुलवी तुला
हे भुलवी तुला
फुला फुला रे फुला फुला
हे हे फुला फुला रे फुला फुला
लपसी कुठे तू वाऱ्यापाठी
तुझ्याच हृदयी तुझ्याच ओठी
लपसी कुठे तू वाऱ्यापाठी
तुझ्याच हृदयी तुझ्याच ओठी
तुझ्या फुलविते दला दला
दला दला
फुला फुला रे फुला फुला
फुला फुला रे फुला फुला
हो फुला फुला रे फुला फुला
फुला फुला रे फुला फुला