Nighale Asatil Rajkumar
निघाले निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार
पथ मिथिलेचे असतिल चुंबित
कमळदळे हळुवार
निघाले निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार
कुठे पहाटे तृणांकुरांवर
कुठे पहाटे तृणांकुरांवर
धुके पसरले असेल सुंदर
हिमरंगावर निळी पाऊले
उमटवित सुकुमार
निघाले निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार
आ आ आ आ आ
कुठे तरूतळी सायंकाळी
कुठे तरूतळी सायंकाळी
विसावेल ती मूर्त सावळी
तरूशाखांनी असेल केला
तारासम झंकार
निघाले निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार
अंग थरथरे लवती लोचन
अंग थरथरे लवती लोचन
समीप असतील श्री रघुनंदन
समीप असतील श्री रघुनंदन
आज स्मराने हळू उघडिले
आर्त मनाचे द्वार
निघाले निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार