Kanha Disena Kuthe
बावरले मी काहुरले धीर मनाचा सुटे
सयांनो कान्हा दिसेना कुठे
सयांनो कान्हा दिसेना कुठे
बावरले मी काहुरले धीर मनाचा सुटे
सयांनो कान्हा दिसेना कुठे
सयांनो कान्हा दिसेना कुठे
सखा श्रीहरी स्वप्नी यावा
कदंब तरूच्या तळी बसावा
कधी हसावा कधी रुसावा
कधी हसावा कधी रुसावा
नयनी माझ्या भरुनी घ्यावे सगुण रूप गोमटे
सयांनो कान्हा दिसेना कुठे
सयांनो कान्हा
मोहन दिसला ग दिसला
मोहन दिसला ग दिसला
मोहन दिसला ग दिसला
प्रीत जुळली ग कळी खुलली ग हा
प्रीत जुळली ग कळली ग त्याची कला हो हो हो
मोहन दिसला ग दिसला
मोहन दिसला ग दिसला
मूर्ती सजणाची ती प्रतिमा मदनाची
भाषा मज कळली नयनांची नयनांची
झाले बेधुंद रूप पाहुनी
झाले बेधुंद रूप पाहुनी
मनमोहन हृदयी ठसला हो हो हो
मोहन दिसला ग दिसला
मोहन दिसला ग दिसला
मोहन दिसला ग दिसला