Jeevani Aadhar Too
सोनफूल तू रानवेल मी सोड हा अविचार तू सोड हा अविचार तू
आधार तू आधार तू जीवनी आधार तू जीवनी आधार तू
कोठली मी तू कुणाचा योग आला दो जिवांचा
शून्य माझ्या अंतरीचा उजळला अंधार तू उजळला अंधार तू
आधार तू आधार तू जीवनी आधार तू जीवनी आधार तू
चांदण्याचा हा फुलोरा रोमरोमी ये शहारा
चांदण्याचा हा फुलोरा रोमरोमी ये शहारा
दिवसरात्री उधळला रे आगळा शृंगार तू आगळा शृंगार तू
आधार तू आधार तू जीवनी आधार तू जीवनी आधार तू
तू विसावा प्राणनाथा प्रीतीचा सोभाग्यदाता
तू विसावा प्राणनाथा प्रीतीचा सोभाग्यदाता
सोनियाच्या पाउलांनी दिपविला संसार तू दिपविला संसार तू
आधार तू आधार तू जीवनी आधार तू जीवनी आधार तू