Avati Bhavati Dongarjhadi
हं हं हं हं आ आ आ आ आ
अवतीभवती डोगर झाडी मधी माझी ग सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी दारी बांधली बैलांची जोडी ई ई ई ई आहा
इथं भरताला तालेवार तालुक्याचा सावकार गोड बोल गल्लाराव गडी गावात रुबाबदार गडी गावात रुबाबदार
दोन डोंगरामधली वाट वर चढाया अवघड घाट हो हो आ आ
हो दोन डोंगरामधली वाट वर चढाया अवघड घाट
घोडें घेऊन मुराळी आला ग मी निघाले नांदायाला
नवी कोरी नेसून साडी बघाना
नवी कोरी नेसून साडी
अवतीभवती डोगर झाडी मधी माझी ग सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी दारी बांधली बैलांची जोडी
इथं भरताला तालेवार तालुक्याचा सावकार गोड बोल गल्लाराव गडी गावात रुबाबदार गडी गावात रुबाबदार
घोड़े चालतंय दिडकी चाल झोक घेतात कानात डुल हो हो आ आ
हा घोड़े चालतंय दिडकी चाल झोक घेतात कानात डुल
माझ्या गळ्यात वजर॒टिका ग नाकी नथिनं धरलाय ठेका
घातली हौसेन सोन्याची बुगडी
अवतीभवती डोगर झाडी मधी माझी ग सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी दारी बांधली बैलांची जोडी
इथं भरताला तालेवार तालुक्याचा सावकार गोड बोल गल्लाराव गडी गावात रुबाबदार गडी गावात रुबाबदार
सख्या संगती एकांतात प्रीत फुलंल अंधारात हो हो आ आ
हा सख्या संगती एकांतात प्रीत फुलंल अंधारात
हुईल काळजात गोड गुदगुली हा लाल होतील गाल मखमली
मिळल मिठीत मधाची गोडी आहा
अवतीभवती डोगर झाडी मधी माझी ग सासुरवाडी