Diwali Yenar Angan Sajnaar

Yeshwant Deo

दिवाळी येणार अंगण सजणार
आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
रुप्याच्या ताटात दिवा नी अक्षत
ओवाळणी थाटात घरोघरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी

रांगोळीने सजेल उंबरठा
पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाश कंदील
नभांत सरसर चढतील
ताई भाऊ जमतील गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षासरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी

सनईच्या सुरांत होईल पहाट
अत्तराचं पाणी स्नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुल बाज्या झडतील फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
दिवाळी येणार अंगण सजणार
आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी

देवापाशी मागेन एकच दान
भावाच्या यशाची चढो कमान
चढो कमान चढो कमान
औक्ष असू दे बळकट
नको करू ताटा तूट
औक्ष असू दे बळकट
नको करू ताटा तूट
चंद्रज्योती हसणार फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी
आमच्या घरी अन तुमच्या घरी

Curiosità sulla canzone Diwali Yenar Angan Sajnaar di Anuradha Paudwal

Chi ha composto la canzone “Diwali Yenar Angan Sajnaar” di di Anuradha Paudwal?
La canzone “Diwali Yenar Angan Sajnaar” di di Anuradha Paudwal è stata composta da Yeshwant Deo.

Canzoni più popolari di Anuradha Paudwal

Altri artisti di Film score