Tula Kalave Mala Kalave

तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तरी कधी पाळता न यावा
ओठांचा जो प्रघात आहे
तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे मला कळावे

जरी भेटशी मिठीत माझ्या
तुला पाहतो दिशात दाही
जरी भेटशी मिठीत माझ्या
तुला पाहतो दिशात दाही
तुझ्याच साठी तुला सोडुनी
तुझ्याच साठी तुला सोडुनी
निघून मी दूर जात आहे
तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे मला कळावे

गुरफटती पायातच वाटा
अन वाटांवर पाऊल भुलते
गुरफटती पायातच वाटा
अन वाटांवर पाऊल भुलते
मला कळेना आयुष्याच्या
मला कळेना आयुष्याच्या
मी कुठल्या जंगलात आहे
तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे मला कळावे

उगाच का मी वणवण केली
उगाच का मी उनाड झालो
उगाच का मी वणवण केली
उगाच का मी उनाड झालो
कुणीतरी बोलले मला की
कुणीतरी बोलले मला की
तुझ्याकडे पारिजात आहे
तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तरी कधी पाळता न यावा
ओठांचा जो प्रघात आहे
तुला कळावे मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
जे दोघांच्या मनात आहे
जे दोघांच्या मनात आहे

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music