Tu Jithe Mi Tithe

Ashwini Shende

तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे हम्म आता
स्पर्श ओल्या हम्म वाटा
मी न माझी राहिले आता
सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
हो सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
शोधते स्वतःला भेटूनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
हो सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे

गुणगुणावे मी तुला मग तू मला ही सुचावे
बोलुनी झाले तरी ही खूप काही उरावे
हम् गुणगुणावे मी तुला मग तू मला ही सुचावे
बोलुनी झाले तरी ही खूप काही उरावे
हो बोलणे नको हे सांगणे आता
पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
हो-हो सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे-तुझे अन त्या ढगांवर चालणे
अंतरे संपून जावी विरघळावे दुरावे
कोण होतो? काय झालो? ना मिळावे पुरावे
अंतरे संपून जावी विरघळावे दुरावे
कोण होतो? काय झालो? ना मिळावे पुरावे
सांगणे सुखाचे ऐकवू जगा
पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा
तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
हो तू जिथे मी तिथे
तू जिथे मी तिथे
हो स्वप्न वेडे हम्म आता
स्पर्श ओल्या हम्म वाटा
मी न माझी राहिले आता

Curiosità sulla canzone Tu Jithe Mi Tithe di स्वप्निल बांदोडकर

Chi ha composto la canzone “Tu Jithe Mi Tithe” di di स्वप्निल बांदोडकर?
La canzone “Tu Jithe Mi Tithe” di di स्वप्निल बांदोडकर è stata composta da Ashwini Shende.

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music