Sauri
मी सजले नाही तुझियासाठी
हो मी सजले नाही तुझियासाठी
रे भानच नाही तुझियापाठी
मी सजले नाही तुझियासाठी
रे भानच नाही तुझियापाठी
दोन क्षणांच्या नयनांच्या भेटी
पुढे पुढे मज जगण्यासाठी जगण्यासाठी
मी संगमी घर त्यागिले
सुख त्याजिले पथ चालले
मी संगमी घर त्यागिले
सुख त्याजिले पथ चालले
मी सौरी येऊन निजकरे सावरी (सौरी सौरी सौरी)
मी सौरी सौरी
मी सौरी येऊन निजकरे सावरी
मी सौरी
काजळ पसरे केस मोकळे
पदरासंगे भान हि गळे
वस्त्र फाटके पायी काटे
तुझ्यामुळे पण मखमल वाटे
उन्हातुनी छाया तुझी
मेघातुनी माया तुझी
उन्हातुनी छाया तुझी
मेघातुनी माया तुझी
माझी न हि काया तुझी
सबाह्य अभ्यंतरी
मी सौरी येऊन निजकरे सावरी
मी सौरी सौरी
मी सौरी येऊन निजकरे सावरी
मी सौरी
चंद्र पाहता फुले कमळ जे
भाऊक भोळे त्याचे डोळे
थरारते ते मनी परंतु
ओठावाटे काही न बोले
मी बोलते भाषा तुझी
हृदयातुनी आशा तुझी
मी बोलते भाषा तुझी
हृदयातुनी आशा तुझी
मेंदीची हि रेषा तुझी
माझ्या तळहातावरी
मी सौरी येऊन निजकरे सावरी
मी सौरी सौरी
मी सौरी येऊन निजकरे सावरी
मी सौरी
मी सौरी येऊन निजकरे सावरी
मी सौरी सौरी