Manat Majhya
मनात माझ्या होते दोन शब्द ओळखीचे
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखीचे
मनात माझ्या होते दोन शब्द ओळखीचे
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखीचे
कधी ते गालावर नाचत होते
डोळ्यांच्या मिठीतून शोधत होते
ओठांच्या पाकळीत स्वप्नांच्या ओंजळीत होते
मनात माझ्या होते दोन शब्द ओळखीचे
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखीचे
हृदयाच्या काठावरून वाट कोणाची तरी पाहतो
नजरेच्या वाटेवरून कुठे कुणाला तरी शोधतो
हृदयाच्या काठावरून वाट कोणाची तरी पाहतो
नजरेच्या वाटेवरून कुठे कुणाला तरी शोधतो
आकाशी या आठवणींचा करतो रोज पसारा
श्वासांच्या या लाटेवरूनी करतो एक इशारा
कधी ते गालावर नाचत होते
डोळ्यांच्या मिठीतून शोधत होते
ओठांच्या पाकळीत स्वप्नांच्या ओंजळीत होते
मनात माझ्या होते दोन शब्द ओळखीचे हो हो
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखीचे
एकटाच वाऱ्यासवे बेभान कुठे तरी धावतो
सूर सारे गुंफून हा ओढ मनातली सांगतो
एकटाच वाऱ्यासवे बेभान कुठे तरी धावतो
सूर सारे गुंफून हा ओढ मनातली सांगतो
ताऱ्यांशी हा गगनी जाऊन जोडून येतो नाते
त्या शब्दांना सजवून भोवती मन हे बहरून जाते
कधी ते गालावर नाचत होते
डोळ्यांच्या मिठीतून शोधत होते
ओठांच्या पाकळीत स्वप्नांच्या ओंजळीत होते
मनात माझ्या होते दोन शब्द ओळखीचे
माझ्याशी बोलत होते ते शब्द ओळखीचे