Ha Chandra Tujhyasathi

हा चंद्र तुझ्यासाठी ही रात तुझ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी
हा चंद्र तुझ्यासाठी ही रात तुझ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशावेळी मज याद तुझी आली
ये ना
मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु
अनुरागी रसरंगी होऊन ये तु
नाजुकशी एक परी होऊन ये तु

वर्षाव तुझ्या तारुण्याचा
रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशिम तुझ्या लावण्याचे
चंदेरी माझ्यावरी लहरु दे
नाव तुझे माझ्या ओठावर येते
फुल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते अधुरा मी येथे
चांद रात ही बघ निसटुन जाते
बांधिन गगनास झुला जर देशील साथ मला
ये ना
मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु
अनुरागी रसरंगी होऊन ये तु
नाजुकशी एक परी होऊन ये तु

हे क्षण हळवे एकांताचे
दाटलेले माझ्या किती भोवताली
चाहुल तुझी घेण्यासाठी
रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तु मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनही न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला दे आता हाक मला
ये ना
मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु ये ना
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु ये ना
अनुरागी रसरंगी होऊन ये तु ये ना
नाजुकशी एक परी होऊन ये तु

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music