Ek Ek To Kshhan
Nitin Aakhawe
एक एक तो क्षण आला
एक एक तो क्षण आला
तुझ्यातला माझ्यातला
सजून गेला आसवांनी
चिंब मज भिजवून गेला
एक एक तो क्षण आला
एक एक तो क्षण आला
झरुनी गेल्या क्षणसरीनी
अजुन ओला मी सखे
का असे झाले मला
ते सुख सखे ग पारखे
कोरडी झालीस तू तरी
अजुनी मी ओलावला
एक एक तो क्षण आला
एक एक तो क्षण आला
बेगडी दुनियेत माझ्या
भावनांचा खून झाला
वेदनांचा माझिया गे
ना कुणाला भार झाला
जाणवे तो सोनचाफा
त्या तुझ्या श्वासातला
एक एक तो क्षण आला
एक एक तो क्षण आला
वेगळी व्याकुळता ही
आगळी आतुरता
तोच मी अन तीच तू तरी
का सुरांना आर्तता
जो दिला तू अर्थ त्यांना
तोच मी स्वीकारला
एक एक तो क्षण आला
एक एक तो क्षण आला
तुझ्यातला माझ्यातला
सजून गेला आसवांनी
चिंब मज भिजवून गेला
एक एक तो क्षण आला
एक एक तो क्षण आला