Ashya Ya Sanjveli

Anil Kamble

अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला
रिकाम्या ओंजळीला या फुलांचा भार का झाला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला

निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया
निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया
निळ्या अंधार लाटेचा किनारा पैंजणे झाला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला

कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले
कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले
मनाच्या स्वैर मोराचा पिसारा मोकळा झाला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला

पहाटे स्वप्न पक्षांनी किनारे झाकले दोन्ही
पहाटे स्वप्न पक्षांनी किनारे झाकले दोन्ही
मिठीच्या वादळा काठी उसासा चंदनी झाला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला
रिकाम्या ओंजळीला या फुलांचा भार का झाला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला
अशा या सांज वेळेला सुखाचा गंध का आला

Curiosità sulla canzone Ashya Ya Sanjveli di स्वप्निल बांदोडकर

Chi ha composto la canzone “Ashya Ya Sanjveli” di di स्वप्निल बांदोडकर?
La canzone “Ashya Ya Sanjveli” di di स्वप्निल बांदोडकर è stata composta da Anil Kamble.

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music