आला होळीचा सण लय भारी [Original]

Guru Thakur, Ajay - Atul Gogavale

लय भारी
लय भारी
लय भारी
लय भारी

हे, लय-लय-लय, लय भारी
मस्तीची पिचकारी, जोडीला गुल्लाल रे
हे, भीड-भाड सोडून, बेभान होऊन
धिंगाणा घालूया रे
हे, भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया, नशा
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
(होओहो-ओहो-ओहो-ओहो)

हो, चालून आलिया वरसानं संधी
तशात भांगेची चढलीया धुंदी
चिंब होऊ या, रंगात रंगू ये (ओहो-ओहो-ओहो-ओहो)
हे, जा-रे-जा शोधू नको तू बहाणा (अहा)
फुक्कट साधू नको रे निशाणा (अहा)
नको छेडू तू, जरा दमाने घे (अहा-अहा-अहा-अहा)
हो, होळीच्या निमतानं (हा), घालूया थैमान (हा)
मोकाट हे रान सारं आता
भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या

हो, तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला (ओहो)
सोडू कसा सांग मौका रसिला (ओहो)
आज जोडीने करुया कल्ला, तू ये (ओहो-ओहो-ओहो-ओहो)
ए, चिक्कार झाले हे फंडे पुराने (आहा)
रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाने (आहा)
फिरते घेऊन मी दुनिया खिशात रे (अहा-अहा-अहा-अहा)
हो, नजरेचे हे बाण (हा), सोडून बेफाम (हा)
झालोया हैराण येडापिसा
भांगेच्या तारेत (हा), रंगाच्या धारेत (हा)
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया, नशा
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या

हे, लय भारी

Curiosità sulla canzone आला होळीचा सण लय भारी [Original] di स्वप्निल बांदोडकर

Chi ha composto la canzone “आला होळीचा सण लय भारी [Original]” di di स्वप्निल बांदोडकर?
La canzone “आला होळीचा सण लय भारी [Original]” di di स्वप्निल बांदोडकर è stata composta da Guru Thakur, Ajay - Atul Gogavale.

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music