Udas Ka Tu

Sudhir Phadke, G D Madgulkar

वेलीवरची फुलं पाहून काळीज करपून जावं
अश्या चमत्कारिक परिस्तिथी मध्ये महाराणी कौशल्या असतांना
महाराज दशरथ आले आणि आपल्या लाडक्या राणीला सांगू लागले

उदास कां तूं आवर वेडे नयनांतिल पाणी
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी
उदास कां तूं आवर वेडे नयनांतिल पाणी
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

वसंत आला तरूतरूवर आली नव पालवी
वसंत आला तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तूं करी
ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी
विचार माझा मला जागवी
विचार माझा मला जागवी आलें हें ध्यानीं
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली
निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली
वसिष्ठ काश्यप जाबालींना घेउन ये या स्थली
इष्ट काय तें मला सांगतिल
इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

आले गुरुजन मनांतलें मी सारें त्यां कथिले
आले गुरुजन मनांतलें मी सारें त्यां कथिले
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
नवनीतासम तोंच बोलले
नवनीतासम तोंच बोलले स्निग्धमधुर कोणी
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे मनोदेवता वदे
तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे मनोदेवता वदे
याच मुहूर्ती सोड अश्व तूं
याच मुहूर्ती सोड अश्व तूं सत्वर तो जाउं दे
मान्य म्हणालों गुर्वाज्ञा मी
मान्य म्हणालों गुर्वाज्ञा मी कर जुळले दोन्ही
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः
अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः
त्याच्या करवीं करणे आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

सरयूतीरीं यज्ञ करूं गे मुक्त करांनी दान करूं
मुक्त करांनी दान करूं
शेवटचा हा यत्न करूं गे अंती अवभृत स्नान करूं
अंती अवभृत स्नान करूं
ईप्सित तें तो देइल अग्नी
ईप्सित तें तो देइल अग्नी अनंत हातांनीं
लाडके कौसल्ये राणी
लाडके कौसल्ये राणी

Curiosità sulla canzone Udas Ka Tu di सुधीर फडके

Quando è stata rilasciata la canzone “Udas Ka Tu” di सुधीर फडके?
La canzone Udas Ka Tu è stata rilasciata nel 2004, nell’album “Udaas Ka Tu”.
Chi ha composto la canzone “Udas Ka Tu” di di सुधीर फडके?
La canzone “Udas Ka Tu” di di सुधीर फडके è stata composta da Sudhir Phadke, G D Madgulkar.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di