Tuze Roop Chitti Raho

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो

देहधारी जो जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहूनी आगळा न धर्म
तुला आठवावे गावे हाच एक नेम
तुला आठवावे गावे हाच एक नेम
देह प्रपंचाचा दास
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझे रूप चित्ती राहो

तुझ्या पदी वाहीला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा
तुझ्या पदी वाहीला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा नाम तुझे घेतो गोरा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

Curiosità sulla canzone Tuze Roop Chitti Raho di सुधीर फडके

Quando è stata rilasciata la canzone “Tuze Roop Chitti Raho” di सुधीर फडके?
La canzone Tuze Roop Chitti Raho è stata rilasciata nel 2004, nell’album “Sant Gora Kumbhar”.
Chi ha composto la canzone “Tuze Roop Chitti Raho” di di सुधीर फडके?
La canzone “Tuze Roop Chitti Raho” di di सुधीर फडके è stata composta da G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di