Nachat Nachat Gaave
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें
आज कशाची किमया घडली कणकण गंधित झाला
एक अनामिक आनंदानें जीवच मोहुन गेला
या वेडाच्या लहरीसंगे
या वेडाच्या लहरीसंगे तन्मय होउन जावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें
माझी मजला जाण नसावी अंतर माझे भोळें
अवघी काया वार्यावरतीं सूरच होउन डोले
अणुरूपानें परमात्म्याला
अणुरूपानें परमात्म्याला भेटुन मागे यावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें
आयुष्याला उधळित जावें केवळ दुसर्यापायीं
आयुष्याला उधळित जावें केवळ दुसर्यापायीं
या त्यागाच्या संतोषाला जगिं या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठीं
जन्म असावा देण्यासाठीं एक मनाला ठावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें