Tila Jagu Dya
जगू द्या जगू द्या
जगू द्या जगू द्या
कोमल आहे नाजूक आहे
आहे जरी बावरी
तिला जगू द्या
जन्म घेऊ द्या
खुशाल आपल्या घरी
कोमल आहे नाजूक आहे
आहे जरी बावरी
तिला जगू द्या
जन्म घेऊ द्या
खुशाल आपल्या घरी
खुशाल आपल्या घरी
या विश्वाच्या अस्तित्वाचे
तिचं एक कारण
ऊन सावली पाऊस वारा
कंच हिरवा श्रावण
बागडेल ती येथे तेथे
फुलपाखरा परी
तिला जगू द्या
जन्म घेऊ द्या
खुशाल आपल्या घरी
खुशाल आपल्या घरी
पडते लढते घडवित उडते
लावुनी अग्नी पंख
उरी दडवते दुःख वेदना
हजार जहरी डंख
तरी बरसते जगा हसविण्या
होऊन झिरमिर सरी
तिला जगू द्या
जन्म घेऊ द्या
खुशाल आपल्या घरी
खुशाल आपल्या घरी
आई बहीण सखी म्हणुनी
असते ती सिद्ध
या अनाहत विश्वाचा हो
तीच एक मध्य
विजयाची अन तेजाची ती
फुले माळते शिरी
तिला जगू द्या
जन्म घेऊ द्या
खुशाल आपल्या घरी
खुशाल आपल्या घरी
कोमल आहे नाजूक आहे
आहे जरी बावरी
तिला जगू द्या
जन्म घेऊ द्या
खुशाल आपल्या घरी
खुशाल आपल्या घरी
खुशाल आपल्या घरी
खुशाल आपल्या घरी