Kuthe Haravun Gele
कुठे हरवून गेले
गंध सारे त्या दिसांचे
कुणी अन मग नेले
रंग सारे त्या नभाचे
आज विझल्या स्वप्नाचे
उरलेले दिवे
आज सरलेल्या स्वप्नाचे
तुटलेले दुवे
कुठून आलो दोघेही
कुठे निघालो दोघेही
हरून गेलो दोघेही
हरवूनी आता
कुठे हरवून गेले
गंध सारे त्या दिसांचे
कुणी अन मग नेले
रंग सारे त्या नभाचे
विरहाने ज्या दिल्या
त्या साऱ्या डागण्या
चटक्यांनी जाळल्या
केव्हाच्या चांदण्या
भरभरून लाभली
जे सारे आसवे
उडले डोळ्यात ह्या
ते सारे आर्जवे
नाते हे
क्षणात तुटते रे
दुख दाटे का युगांचे
कुठे हरवून गेले
गंध सारे त्या दिसांचे
कुणी अन मग नेले
रंग सारे त्या नभाचे