Manatlya Manat Mi
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो
वसंत रोज पाहतो
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
असेच रोज न्हाऊनी लपेट उन्ह कोवळे
असेच रोज न्हाऊनी लपेट उन्ह कोवळे
असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो
वसंत रोज पाहतो
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले
अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी कळ्यास गूज आपुले
तुझ्या कळ्या तुझी फुले
तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो
वसंत रोज पाहतो
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तसा न राहिला आता उदास एकटेपणा
तसा न राहिला आता उदास एकटेपणा
तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा
हा हा कसा हवेत मी
हा हा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
वसंत रोज पाहतो
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो
वसंत रोज पाहतो
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो