Kiti Sawarava

किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल
काळजाच्या आजारा
सापडंना उतारा
बेईमान चांदवा
भोगतोय अंधारा
किती सावरावा तोल

हो काही सुचना काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान धावतं मन
कानात भरून वारं
हो काही सुचना काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान धावतं मन
कानात भरून वारं
याला प्रेम म्हणावं की आग
भरं जखम उरावा डाग
हो किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल खोल

तुझी आठवण येता
हारवती चोरवाटा
कशी पडली जीवाला रानभूल
डोळा डसलं सपान
उरे अधूरच गाणं
घट्ट नात्यातली वीण झाली सैल
हो उभा जन्म हा जाळावा
तुझ्या एका सावलीशी
वाट बासरी पाहाते
कधी राहीन ओठांशी
याला प्रेम म्हणावं की आग
भरं जखम उरावा डाग
याला प्रेम म्हणावं की आग
भरं जखम उरावा डाग
हो किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल खोल
आ आ आ आ

Canzoni più popolari di आदर्श शिंदे

Altri artisti di Film score