Utha Jage
उठा जागे व्हा रे आतां स्मरण करा पंढरीनाथा
भावें चरणीं ठेवा माथां चुकवीं व्यथा जन्माच्या आ आ
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
धन दारा पुत्र जन
बंधू सोयरे पिशून
सर्व मिथ्या हें जाणून शरण रिघा देवासी आ आ
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
माया विघ्नें भ्रमला खरें म्हणता मी माझेनि घरे
हें तों संपत्तीचें वारें साचोकारें जाईल
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
आयुष्य जात आहे पाहा काळ जपतसे महा
स्वहिताचा घोर वहा ध्यानीं राहा श्रीहरीच्या आ आ
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
संतचरणी भाव धरा क्षणाक्षणा नामा स्मरा
मुक्ति सायुज्यता वरा हेंचि करा बापांनों
धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन
विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा
भुलूं नका भव कामा भुलूं नका भव कामा
धरा अंतरी निजप्रेमा न चुका नेमा हरिभक्ति
धरा अंतरी निजप्रेमा न चुका नेमा हरिभक्ति
धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून
सर्व मिथ्या हें जाणून शरण रिघा देवासी