Maharudra Avatar
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
नमस्कार माझा तया मारुतीला
तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
नमस्कार माझा तया मारुतीला
गिळायासी जाता तया भास्करासी
तिथे राहु तो येउनी त्याजपासी
तया चंडकीर्णा मारिता तो पळाला
नमस्कार माझा तया मारुतीला
नमस्कार माझा तया मारुतीला
खरा ब्रह्मचारी मनाते विचारी
म्हणोनी तया भेटला रावणारी
दयासागारू भक्तीने गौरविला
नमस्कार माझा तया मारुतीला
नमस्कार माझा तया मारुतीला
सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा
धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा
गिरी आणुनी शीघ्र तो उठविला
नमस्कार माझा तया मारुतीला
नमस्कार माझा तया मारुतीला
जगी भीम तो मारुती ब्रह्मचारी
समस्तांपुढे तापसी निर्विकारी
नमू जावया लागी रे मोक्षपंथा
नमस्कार माझा तया हनुमंता
नमस्कार माझा तया हनुमंता
नमस्कार माझा तया हनुमंता